0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

जागतिक पर्यावरण दिना निमित्त रूद्र प्रतिष्ठान च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनसेचे विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रूद्र प्रतिष्ठानचे विनयकुमार सिंह, मनसेचे संदीप चव्हाण व मयूर तळेकर उपस्थित होते. कोरोना संकंटामुळे आॅक्सिजन (प्राणवायू) चे महत्त्व सर्वांना कळले आहे. आपल्याला निसर्गाकडून मोफत मिळणारा प्राणवायू अनमोल आहे. वृक्षसंपदा जोपासणे व वाढवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.असे संदीप पाचंगे यावेळी म्हणाले.

Post a Comment

 
Top