web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडचा रेशनिंग भ्रष्टाचार म्हणजे महसुलचा वसुली वाझे

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

गेल्या परंपरेने चालत आलेला रेशनिंग धान्य पुरवठा विभागाचा भ्रष्टाचार म्हणजे महसुल विभागाचा वसुली वाझे संबोधला जातो त्याकडे दुर्लक्ष करणार्याना गोरगरीबाच्या टाळू वरचे लोणी खाण्याची सवय झालीच त्याचा ओग गेल्या दोन वर्षात कोरोना काळात क्षमतेच्या पलीकडे गेला आहे.कोरोना कालावधीत मोफत धान्य सरकारने दिले डाळ दिली मात्र रेशनिंग दुकानदारांनी धान्य डाळ अन्य वस्तु मिळवण्यासाठी बोगस कार्डधारकात लाभार्थी वाढ केली उपस्थित नसलेल्याचा धान्य उचलुन काळयाबाजारात विक्री केली लोकसंख्या वाढवली स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिलेला 12 रूपये  किलोचा धान्य कुठे गेला मोफत आलेली  डाळ एक किलो देवुन उर्वरित काळयाबाजारात विकली धान्य काळयाबाजारात विक्री केली मात्र कागदोपत्री  सारं चोख मात्र ऑनलाईनला दिल्याची नोंद असा भ्रष्टाचार मुरबाड  तहसिलच्या पुरवठा विभागानी केले आहे.धान्य घोटाळयाची तक्रार चौकशी  गृहविभागानी मुरबाडच्या कार्यालयात  पाठवली मात्र अद्याप चौकशीचे आहवाल पत्र्र गायब आहेत तेथील कर्मचारी कोण हे ओळखण कठीण आहे.दुकानदारांची टोळी आजपर्यंत अधिकार्याच्या समोर स्वताचे ठसे देत आहेत मात्र कार्डधारकांचे ठसे कुठे गेले आज पर्यंत लाखो किलो धान्य रॉकेल डाळ अन्य वस्तू लाभार्थीच्या नांवे लाटली त्या लाभार्थ्यांची चौकशी झाली त्यामध्ये लाभार्थी संख्या कमी झाली मात्र आजपर्यंत त्याकार्ड धारकांचे धान्य याचं रेशनिंग टोळीने खाल्ले  रेशनिंगधान्य टोळीचे मोरखे सरळगांव,म्हसा,मुरबाड,खापरी,धसई,जांबुर्डे,टोकावडा तसेच मुरबाडच्या पिठाच्या चक्की पर्यंत निर्माण झाले आहेत त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे अनेक लोकांना धान्य मिळत नाही.शासनाचे मोफत धान्य कमी जास्त प्रमाणात देवुन दोन रूपये किलोचे धान्य काळयाबाजारात विक्री केली जाते एकाच गाडीत चार दुकानदारांचे धान्य नेवुन सरळगांव म्हसा टोकावडा येथे उतरवला जातो मुरबाड सरळगांव म्हसा टोकावडा खापरी अन्य ठिकाणी धान्य काळयाबाजारातुन जातंय त्यावर कारवाई होत नाही.

 

No comments