web-ads-yml-728x90

Breaking News

दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मानवी साखळीद्वारे मुरबाडमध्ये मागणी

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत मुरबाडमध्ये मानवी साखळी करण्यात आली. विमानतळाला 'दि.बां' चंच नाव'. 'नवी मुंबई विमानतळाला दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव हवे'. अशा घोषणांनी आज मुरबाड महामार्ग दुमदुमला. कल्याण-मुरबाड-माळशेज महामार्ग ते मुरबाड तहसीलदार कार्यालय असे आज साखळी आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्यावे या मागणीचे निवेदन . किसन कथोरे व  लोकनेते दि.बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. या प्रसंगी आमदार किसन कथोरे,रिपाइं सेक्यूलरचे ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद चंदने, मा.नगराध्यक्षा शितल तोंडलीकर, किसन अनंत कथोरे, मा. उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी. मुरबाड नगर पंचायतीच्या मा. नगरसेवक, नगरसेविका   अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

No comments