web-ads-yml-728x90

Breaking News

संभाव्य पूर परिस्थितीत प्रशासनाने समन्वयाने व आघाडीवर राहून काम करावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – सांगली

संभाव्य पूर परिस्थितीच्या काळात  कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याच्या महसूल व जलसंपदा विभागासह संबधित सर्वच विभागांनी सतर्क व आघाडीवर राहून काम करावे.  पुराच्या कालावधीमध्ये 24 तास आपले फोन चालू ठेवावेत. ज्यांचा फोन बंद येईल. तो कामावर नाही असे समजण्यात येईल. आपत्तीजन्य परिस्थिती कधी तयार होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या संदेशाकडे लक्ष ठेवले पाहिजे. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी जलसंपदा विभागाने प्रत्येक गावात काय परिस्थिती निर्माण होईल, किती गावे पाण्याखाली जातील. याबाबत येत्या 15 दिवसात नागरिकांना समजावून सांगून पूरबाधित क्षेत्राच्या आराखड्यांबाबत प्रशिक्षण द्यावे. असे निर्देश जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची दूरदृष्यप्रणाली (व्ही. सी.) द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे उपस्थित होते. तर दुरदुष्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रकांत जाधव, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, सांगली महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील यावेळी म्हणाले, मर्यादेपेक्षा जास्त पाऊस झाला तर आपण सर्वांनीच सहकार्याने नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करु. तथापि, याबाबत आपण पुर्व तयारी केल्यास जनतेलाही फार त्रास होणार नाही. पावसाळापुर्व व पावसाळा पश्चात  करव्या लागणाऱ्या दुरुस्ती कामांसाठी आवश्यक साहित्य आत्ताच उपलब्ध करुन ठेवावे. पुरानंतर होणारी जी वाताहत आहे ती दिर्घकाळ चालते. त्यामुळे पूर येणार आहे हे गृहित धरुन ज्या अत्यंत आवश्यक वस्तू किंवा साहित्य त्या त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर पूर ओसरल्यानंतर तात्काळ कामे सुरु करता येईल. त्यामुळे कमी काळ लोकांना त्रास होईल. यासाठी आपण सर्वांजण सतर्क रहाल असा मला विश्वास आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी पूरपरिस्थतीत अग्रभागी राहुन काम करायचे आहे. यामध्ये मागे राहुन चालणार नाही. पूरस्थितीत जिल्हा प्रशासनाने आघाडीवर व लोकांमध्ये राहून काम केले पाहिजे सर्वच संबधित अधिकाऱ्यांनी व यंत्रणांनी आपला सक्रिय सहभाग ठेवला पाहिजे. संबधित सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे. आपली अशी आपेक्षा आहे की मर्यादेतच पाऊस होईल आणि पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही.

No comments