web-ads-yml-750x100

Breaking News

प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मुंबई शहरासह महानगर परिसराच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. हे प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना सुलभ आणि गतिमान परिवहन सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन, महा मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

No comments