web-ads-yml-728x90

Breaking News

मनसेच्या वतीने मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आंदोलन

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

इंटरनेट सेवा बंद असल्याने बाळकूम येथील पोस्ट ऑफिस मधील व्यवहार गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प आहे. पोस्टात बचत , ठेवी असलेले मध्यमवर्गीय , वयस्कर खातेधारक या भोंगळ कारभारामुळे त्रस्त आहेत. यांची गुंतवणूक करणारे एजंट वारंवार व्यवस्था सुधारण्यासाठी पाठपुरावा करत होते. या सगळ्यांनी आज मनसे कडे तक्रार केल्या नंतर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या सूचनेनुसार शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस मधील अधीक्षक श्री व्यवहारे यांची भेट घेऊन एकूणच सर्व प्रकरणाचा जाब विचारण्यात आला , लवकरात लवकर नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले.

त्यांच्या खुलाश्यानुसार सदर व्यवस्था सुधारण्यासाठी पत्रव्यवहार सुरु असून साधारण एक महिन्याचा कालावधी लागेल असे सांगितले.

मनसे नेते बाळा नांदगावकर, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करत असून एक महिन्यात व्यवस्था सुधारल्यास मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल हा ईशारा देण्यात आला.

यावेळी उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण , पुष्कर विचारे , सुशांत सूर्यराव , सचिव नैनेश पाटणकर , निलेश चव्हाण , संजय म्हसे-पाटील, सहसचिव संदीप साळुंखे , विभाग अध्यक्ष आशिष डोके , विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुशांत डोंबे , जनार्दन खरिवले , संदीप नलावडे , जयेश खटके , महिला उपशहर अध्यक्ष मंजुला डाकी उपस्थित होते.

No comments