web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मधील म्हसा रोड वरील क्रिशना गॅरेजसह अन्य गॅरेजची चौकशी करावी;नागरिकांची मांगणी

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड शहरातील मोटार सायकल गॅरेज वाल्यांनी स्पेअर्सपार्टच्या चढया भावानी नागरिकांची लुट चालवली आहे.मुरबाड म्हसा रस्त्यावरील क्रिशना गॅरेज सेन्टर तर आपल्या मर्जीने चढयाभावाने स्पेअर्सपार्टची विक्री करीत असुन त्याची जिएसटी पावती सुध्दा सामान्य ग्राहकाला दिली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

मुरबाड तालुक्यामध्ये गाडी चोरीची प्रकरणे समोर येत असून अनेक जणांची गाडी ही लापता झाल्याची चर्चा आहे तर पोलीस यंत्रणांनी काही गाडी चोरांच्या मुसक्या आवळून ज्यांच्या गाडया चोरीला गेल्या आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांची गाडी ही मिळवून देण्यात यश आले आहे परंतू काही अशा भामटे चोर आहेत की गाडी चोरून भंगारमध्ये विक्री केल्या असतील तर काही चोरांनी मॉडेल बदलण्याकरिता गॅरेजचा आधार घेतला असेल त्यामुळे काही जणांच्या गाडीचा शोध अद्दयापही लागला गेला नाही.त्यातच गॅरेजवाल्यांनी आपल्याकडे आलेल्या दुरूस्तीच्या गाडीचा तपास करण्याकडे दुर्लक्ष केला असून स्वतःच्या धंद्दयाकडे लक्ष वेधले आहे आणि त्यामुळे गाडी चोर हा मालक म्हणून गाडीत बदल करण्याची धरपकड करून गाडीचा चेहरा मोहरा बदलतो.कायदा सांगतो गुन्हा करणारा गुन्हेगार आणि साथ देणाराही तितकाच गुन्हेगार अशा गंभीर विषयाकडे लक्ष वेधले जात नाही आणि भुरटे चोर गाडी जोरण्यात महाशूर होतात म्हणून प्रथम गॅरेज वाल्यांची चौकशी करावी त्यांच्याकडील कोणते साहित्य कोणत्या कंपनीचे कोठून आणले त्याच्या जी.एस.टी पावत्या अन्य पडलेल्या गाडयांची माहिती पोलीस यंत्रणांनी घेऊन त्या त्या गॅरेज मालकाला सविस्तर माहिती पोलीस ठाण्यात देण्यास सांगावे तसेच काही ठिकाणी असलेल्या जागेपेक्षा रोडलगत थांग मांडून रोडापर्यंत गॅरेज आणले अशा गॅरेज वाल्यांची मोजणी प्रमाणे जागेची आखणी व्हावी म्हणून तहसिलदार भूमि अभिलेख अधिकारी यांनीही लक्ष वेधले पाहिजे.

       आज गाडी चोर भन्नाट गाडीचा मॉडेल बदल करून फिरत आहेत त्यामुळे कोण चोर आणि कोण मालक हेच कळेनासे झाले.गॅरेजमध्ये कोणत्याही गाडी मालकाचे नाव नाही,कोणाची गाडी दुरूस्तीला आहे त्याचे ठावठिकाण नाही,चोरीच्या गाडयांचे पार्ट काढून दुसर्या गाडयांना लावण्यात गॅरेजवालेंचा तर हात नाही ना असा प्रश् उपस्थित राहत आहे त्यामुळे मुरबाड शहारात असणार्या गॅरेज वाल्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे

No comments