शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थाच्याही व्यसनमुक्ती उपक्रमात जनतेचे सहकार्य हवे – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
शासनाने अंमली पदार्थावर बंदी घातलेली आहे. सार्वजनिक आरोग्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी घटनेत व्यसनमुक्ती धोरण निश्चित करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवला पाहिजे, कोणत्याही अंमली पदार्थाच्या अमिषाला तरूण पिढी बळी पडू नये यासाठी सर्वांनी सजग रहावे प्रशासनाला व व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन वेबिनारमध्ये त्यांनी हा संदेश दिला.२६ जून जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्याने सामाजिक न्याय विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई शहर जिल्हाधिकारी, समाजकल्याण विभाग, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबईत व्यसनमुक्तीवर कार्यरत असणाऱ्या संस्था, संघटना, अखिल भारतीय नशामुक्त अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत याचे आयोजन करण्यात आले होते.श्री.मुंडे मार्गदर्शन करताना म्हणाले, राज्यघटनेतील अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य व आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी औषधीय प्रयोजनाव्यतिरिक्त मादक पदार्थांवरील बंदीची धोरण निश्चित करण्यात आली आहेत.जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त आयोजित वेबिनारमधून विचारमंथन घडेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.स्थापक नियंत्रण कक्षाचे क्षेत्रीय निदेशक समीर वानखेडे यांनी अमली पदार्थ प्रकार, NDPS कायदा बद्दल माहिती दिली. तसेच पालकांनी मुलांशी संवाद साधत राहून त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे हे सांगितले. महाराष्ट्र शासन अंमली पदार्थाच्या विरोधात असून भारतीय राज्यघटनेतील कलम ४७ अनुच्छेद नुसार औषधांखेरीज अंमली पदार्थांचा वापर होणार नाही, यासाठी कटिबद्ध आहे. पालकांनीही याबाबतीत सतर्क राहून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे.तसेच व्यसनमुक्तीच्या राष्ट्रीय लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले,अंमली पदार्थांचे दुष्परिणाम यांची माहिती दिली. अंमली पदार्थ आणि राष्ट्रीय हानी याचा संबंध जोडून अंमली पदार्थांचा देशद्रोहासाठी होणारा आणि त्यासाठी युवकांचा होणारा वापर, पैशांच्या मोहामुळे त्यात अडकत जाणारी युवापिढी हे देशासमोरील आव्हान असल्याचे सांगत आपण सर्वांनी याबाबत सतर्क राहून अशा प्रकारची माहिती आढळल्यास तात्काळ नार्कोटिक्स कंट्रोल विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले.
No comments