web-ads-yml-728x90

Breaking News

लहूजी शक्ती सेनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मास्क वाटप करुन साजरी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - अहमदनगर

लहूजी शक्ती सेनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मास्क वाटप करुन साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांच्या पुढाकाराने शहरातील नालेगाव येथे हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुशिला सकट, ओम दहिवाळकर, पूजा सकट, अभिजीत मानकर, प्रसाद सकट, आरती सकट आदी उपस्थित होते.

सुनिल सकट म्हणाले की, सामाजिक समतेची मुल्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोवली. त्यांनी जातीय विषमता नष्ट करुन, सर्वांना समान संधी उपलब्ध करुन दिली. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करुन, दुर्बल घटकांना त्यांनी सर्वप्रथम आरक्षण दिले. शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेतल्यास सामाजिक परिवर्तन घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments