web-ads-yml-728x90

Breaking News

विश्वास संस्थेच्या शिबिरात १००० तरुणांचे लसीकरण भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व कु. वृषाली वाघुले यांचा उपक्रम

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

विश्वास सामाजिक संस्था यांच्या वतीने भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व कु. वृषाली वाघुले यांनी आयोजित केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरण शिबिराला ठाणेकर तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १००० हून अधिक तरुण-तरुणींची नोंदणी करण्यात आली.

राज्य सरकारतर्फे १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये स्लॉट उपलब्ध होत नसल्यामुळे तरुण-तरुणींची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लसीकरण शिबिर भरविले होते. या शिबिराच्या उद्घाटनासाठी भाजपाचे ठाणे प्रभारी व आमदार आशिष शेलार यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आमदार शेलार यांनी लसीकरणासाठी आलेल्या तरुणांच्या हस्ते उद्घाटन करून लसीकरणाला सुरूवात केली. या वेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, संदिप लेले, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, राजेश मढवी, नौपाडा युवा मोर्चा पदाधिकारी, कु. वृषाली वाघुले यांची उपस्थिती होती.

या शिबिरात नौपाडा परिसराबरोबरच ठाणे शहराच्या विविध भागातील तरुणांकडून नोंदणी करण्यात आली, त्यांचे नियोजनबद्धरित्या लसीकरण करण्यात आले. दरम्यान, विश्वास सामाजिक संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. यापूर्वी घरेलू कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यापाठोपाठ आज लसीकरण शिबिर पार पडले.

No comments