web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी क.डों.म.पा. सज्ज

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइव कल्याण

कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सज्ज होत असून कोरोना संक्रमित बालकांकरीता शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी महापालिका अविरत विविध उपाययोजना करीत आहेत. तथापी वैदयकीय तज्ञांच्या अंदाजानुसार कोविड-19 ची तिसरी लाट अपेक्षित असून त्यामध्ये विशेषत: लहान बालके कोरोना विषाणूमुळे संक्रमित होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. या अनुषंगाने बालकांचे शाळेशी असलेले वेगळे नाते विचारात घेता कोविड संक्रमित काळात त्यांचे भावनिक व मानसिक संतुलन पोषक राहण्यासाठी मुलांच्या शाळाच मुख्य भूमिका पार पाडू शकणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार कोरोना संक्रमित बालकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता भासल्यास मोठया व्यक्तिंसाठी असलेल्या विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटरपेक्षा मुलांना त्यांच्या शाळेत विलगीकरण कक्ष निर्माण करुन तेथे व्यवस्था केल्यास त्यांचे मन तेथे सहज रमेल. याच दृष्टीने महापालिका क्षेत्रातील  कोविड-19 संसर्गाची लागण होणा-या 8 ते 12 वयोगटातील बालकांची काळजी घेण्यासाठी आणि वैदयकीय उपचारासाठी महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेची प्राथमिक विदयालये आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक विदयालयांमध्ये बालकांकरीता “विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर ” ची संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.

No comments