web-ads-yml-750x100

Breaking News

सजलेली ओटी विझलेली चुल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

मुंबई पासुन हाकेच्या अंतरा वर असुनही मुलभुत सोईसुविधा पासुन वंचित तालुक्यातील अदिवासी बहूल भागातील दारिद्र कुपोषण्याच्या विळख्यातुन सुटका होत नाही , मोल मजुरी आणि काबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या आदिवासी बांधवांना सध्या रोजगार मिळत नसल्यामुळे घरातील दृष्यमुलांच्या मनावर विपरीत परिणाम करीत त्यावर मात करण्याची जिद्द चिमुकल्यात उतरून खेळाबागडायच्या दिवसात  या  चिमुकल्यांवर  मासे मारी करुन ,आपल्या माय बापाची  पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क मच्छर दाणी चा आधार घेऊन ते चिखल तुडवत माशांचे शोधात फिरत असल्याने आदिवासी बांधवांचे उदरनिर्वाहाचा प्रश्र ऐरणीवर आला आहे.                     

     कोरोनमुळे जगभरात घबराट पसरली असल्याने त्याला रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लाॅकडाऊन सुरु केल्याने शहरी भागात काबाडकष्ट करणाऱ्या मजुरांवर उदरनिर्वाह करण्यासाठी मोठी संक्रात आली आहे.त्याच सध्या पाउस देखील नियमितपणे पडत नसल्यामुळे ग्रामिण भागात शेतात ही रोजगार मिळत नाही.तसेच रानमेवा गोळा करून त्याची शहरी भागात विक्री करण्यासाठी प्रवासाचे साधन नाही त्यामुळे आपल्या संसाराचा गाडा चालवायचा  कसा या विवंचनेत असणारा शेतमजूर व आदिवासी बांधव हा घर सोडत नाही.परंतु माय बापाचे हाताला काम नाही तर त्यांचे जवळ चार पैसे येणार कुठून त्यांचेकडे रोजगाराचे साधन नसल्याने आपण खाऊ चा हट्ट तरी कसा करायचा. याचा विचार करून मुरबाड जवळील शिरवली येथील सतिष मुकुंद ठाकरे वय 10वर्षे व त्याची बहीण वेदिका मुकुंद ठाकरे यांनी रात्री झोपताना मच्छर चा त्रास होऊ नये म्हणून आपल्यासाठी आणलेल्या मच्छर दाणी वर लक्ष केंद्रित केले आणि या मच्छरदाणी मुळे आपण शेतात तसेच नाल्यात असणारे मासे पकडुन आणुन शकतो व आपल्या परिवाराचे पोटाची खळगी भरू शकतो .असा विचार करून ज्या शेतात पाणी साचलेले आहे.त्या ठिकाणी या भावंडांनी दोन्ही बाजूंनी मच्छर दाणी पकडून मासे मारी करत आहेत व मिळालेल्या माशांची विक्री करून आपल्या माय बापाला मदतीचा हात देत आहेत.  येथील अनेक वाड्या पाड्या वरील अशा प्ररकारे शालेय विद्यार्थी लहान बालके वृद्ध नागरिक रानमेवा चिंबो-या  मुठे विकून आपली पोटाची खळगी भरतात  विकासाच्या नांवे जाहिर बोंबा ठोकणा-यानी किमान  एक दिवस पिकनिक किंवा सहल म्हणून या अदिवासी वाड्यावर फेरफटका मारला तर  ओटी सजलेली व चुल विझलेली असा विकास पहावयास मिळेल

No comments