web-ads-yml-750x100

Breaking News

पोलिस पाटील यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारा महत्त्वपूर्ण घटक हा पोलिस पाटील होय. कोरोना काळात पोलिस पाटील यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून कौतुकास्पद कार्य केले आहे, पोलिस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे त्यावर गृह विभागाने त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई यांनी  दिले.मंत्रालयात गृहराज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पोलिस पाटील यांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पोलिस महासंचालक संजय पांडे, गृह विभागाचे  अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, पोलिस पाटील यांनी कोरोना  कालावधीत अत्यंत जबाबदारीने फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम केले आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिस पाटलांची असते. कोरोना काळात काळात पोलिस पाटलांनी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी खूप चांगल्या पध्दतीने पार पाडली असून या कामाचे कौतुकही श्री. देसाई या बैठकीदरम्यान केले.

No comments