web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडच्या पिठाच्या गिरणीत दळतंय रेशनिंगचा गहू तांदुळ

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

ग्रामीण भागातील 30 ते 40 रेशनिंग दुकानदार मुरबाड मधील रोठेआळी गणेशनगर परिसरात पहाटेवेळी रेशनिंग धान्य गहू तांदुळ विक्री  करत असुन पिठाच्या गिरण्यात धान्य विक्री होऊन त्याचा पिठ खुल्या बाजारात विक्री होत आहे.याकडे मुरबाड ठाणे पुरवठा अधिकारी तक्रार करूनही जाणुन बुजुन दुर्लक्ष करतात याकडे सरकार जागे होऊन लक्ष घालेल का असा सवाल नागरिक करत आहेत.अनेकवेळा महसुल पुरवठा अधिकार्याकडे तक्रारी करून देखील हप्ते घेणारे अधिकारी कारवाई करत नाहीत पुरावे शोधतात मात्र आजपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही.तसेच महसुल पुरवठा अधिकार्यांनी पोलिसाना कारवाईची लेखी परवानगी दयावी असेही नागरिकाचे म्हणणे आहे.मुरबाड शहरातील अनेक राजकीय श्रेत्राखाली रेशनिंग धान्य गहू तांदुळ साखर रॉकेल डाळ याचा काळाबाजार करत आहेत पिठाच्या गिरणीत ऐवढा मोठा पिठ दळण कोठुन दळायाला येतय मात्र येथे आंधळ दळतयं आणि कुत्र पिठं खातयं अशी स्थिती आहे.भुवन,असोळे,जांबुर्डे ,शिरगांव सह अन्य परिसरातुन वाहाने रेशनिंग तांदुळ गहू मोठया प्रमाणात मुरबाड शहरात पहाटेच्यावेळी विक्रीला येतात यावर जागृत प्रशासनाने कारवाई करावी तसेच मातानगर मध्ये बनावट शितपेय अन्य वस्तुच्या गोडावुन हॉलसेल दुकानाची अन्न औषधे अधिकार्यानी हप्ते घेवुन कारवाईकडे कानडोळा केला आहे.त्याची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा सामाजिक संघटनेनी दिला आहे.

 

No comments