web-ads-yml-728x90

Breaking News

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पीयूसी चेकअप कॅम्पचे आयोजन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

युवा सेना प्रमुख तथा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना ठाणे शहर यांच्या वतीने मोफत पीयूसी चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.वाहनांकडून उत्सर्जित होणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा यासाठी नागरिकांनी पीयूसी काढणे गरजेचे आहे असा संदेश देत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवा सेना ठाणे शहर युवा अधिकारी नितीन लांडगे यांच्या वतीने मानपाडा येथे रिक्षा,बाईक,कार साठी मोफत पीयूसी चेकअप कॅम्प आयोजित केले होते . यामध्ये वाहनचालकांना मोफत पीयूसी काढून देण्यात आल्या.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पर्यावरण संवर्धनासाठी खूप चांगले काम करत आहेत.त्यांच्या या कामात आमचाही हातभार लागावा यासाठी मानपाडा भागातील नागरिकांच्या वाहनाची मोफत पीयूसी काढण्यात आली व नागरिकांनी वेळवर पीयूसी काढून होणारे प्रदूषण रोखण्याचे आव्हान यावेळी नितीन लांडगे यांनी केले.

No comments