web-ads-yml-728x90

Breaking News

नि:क्षारीकरण प्रकल्प हे मुंबईसाठी क्रांतीकारी पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प  सुरु करणे हे महत्त्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त रुप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे, असे प्रातिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत  सह्याद्री अतिथीगृहात बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि.  यांच्यादरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, इस्त्राईलचे महावाणिज्यदूत याकोव फिनकेलस्टाईन, वकालतीमधील अन्य सदस्य, आय.डी.ई वॉटर टेक्नॉलॉजीचे पदाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीए आयुक्त एस श्रीनिवास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments