web-ads-yml-728x90

Breaking News

मॉन्सून दोन-तीन दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मॉन्सून काल ०३-०६-२०२१-गुरुवारी पश्चिम किनारपट्टीवरील कारवारपर्यंत पोहोचला आहे पुढील दोन ते तीन दिवसात तो गोवा आणि मग महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मॉन्सूनने-गुरुवारी केरळनंतर पश्चिम किनारपट्टीवरील कारवारपर्यंत मजल मारली आहे मॉन्सूनची उत्तरसीमा ही कारवार-हरपनारहल्ली अनंतपुर-आरोग्यवरम वेल्लोर-नागपट्टिनम येथून जात आहे पुढील दोन ते तीन दिवसात मॉन्सून गोवा आणि मग महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पुढील दोन दिवसात कर्नाटक किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडणार आहे मॉन्सून कर्नाटक मार्गे महाराष्ट्रात दाखल होतो त्यामुळे कर्नाटक मध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात तो महाराष्ट्रात आणि गोव्यातही पोचणार आहे

No comments