0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

मनोरमानगर येथील रस्त्यावर चिखल अखेर बिल्डरने हटवला आहे.मनोरमा नगर प्रभाग क्रमांक ३ येथील जे व्ही एम स्पेस या बिल्डरचे कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही संरक्षण यंत्रणा न उभारता कन्स्ट्रक्शनच्या कामाचे डंपर मनोरमानगरच्या रस्त्यावरून ये जा करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरती सतत चिखल होत आहे, अक्षरशा लोकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. तरी ठाणे महानगरपालिकेने यासंबंधी पाहणी करून जे व्ही एम स्पेस या बिल्डरवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी केली होते याची दखल घेऊन बिल्डरने मनोरमानगर रस्तावरील चिखल स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे.

Post a Comment

 
Top