web-ads-yml-728x90

Breaking News

त्या महिलेला भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी दिली तहसिलदार कार्यालयात हंगामी नोकरी ; प्रशासकीय सेवेतून माणुसकी झरी जपणारे डॉ.मोहन नळदकर यांची सर्वत्र प्रशंसा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव भिवंडी, ठाणे

जेव्हापासून भिवंडी उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी म्हणून डॉ.मोहन नळदकर यांनी पद्भार स्विकारले तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा ही एक सक्षम अधिकारी भूमिकेतून माणूसकीची झरी जपणारी ठरली आहे.इतकंच नव्हे तर वेळोवेळी शासनाच्या योजना,उपक्रम सर्व सामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत.कोरोना प्रादुर्भावातही भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी आपली जबाबदारी पार पाडत कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याकरिता अपार प्रयत्नही केले आहेत.कोरोना प्रादुर्भावात अनेकांना नितीमत्ता व नैतिकता जपत प्रशासकीय सेवेतून गरिबांना त्यांच्या पातळीवर जाऊन मदत केली त्यांच्या या धडाडी कार्याची प्रशंसा सर्वत्र ठाणे जिल्हयात होत आहे.भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांच्या धडाडी कार्याची चर्चा सध्या चर्चेत आहे ती म्हणजे - एक कातकरी या आदिम आदिवासी जमात म्हणून ओळखल्या जाणार्‍या समाजातील हाली बरफ हिने 12 वर्षापूर्वी जंगलात वाघाने बहिणीवर हल्ला केले असता आपल्या बहिणीचे जीव वाचवून वाघालाही हरविणारी बरफ हिला 2012 साली राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.परंतु अशिक्षीत असल्याने हाली बरफ कडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्याने तिने स्वतः नोकरी मिळविण्यासाठी धडपड सुरू केली, तिची शिधापत्रिकाची ऑनलार्इन नोंद नाही तर अन्न धान्य मिळत नव्हते,तिला कालांतराने यश आले अंत्योदय शिधापत्रिका,घरकुल योजनेंतर्गत मिळाले व उदरनिर्वाहासाठी आदिवासी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत शिपार्इ म्हणून हंगामी नेमणूक करून तिला मदत करण्यात आली.परंतु अलीकडे कोरोना प्रादुर्भाव वाढला जवळ जवळ 1 वर्ष झाले त्यातच लॉकडाऊन असल्याने आश्रमशाळाही बंद झाली त्यातच तिची ती ही नोकरी गमवली गेली.त्यामुळे पुन्हा पहिलेच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले.सदरची बाब भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांना कळताच प्रशासकीय सेवेतून माणूसकी झरी जपत गरिबाला आधार मिळावा व सध्या स्थितीत उदारनिर्वाह सुरळीत व्हावा म्हणून हाली बरफ हिला तीन महिण्याकरिता तहसिलदार कार्यालयात हंगामी नोकरी दिली तसे नियुक्तीपत्र ही यावेळी तिला देण्यात आले.सदरहू गरिब परिस्थितीत देवदूत म्हणून डॉ.मोहन नळदकर यांनी खर्‍या देवाचा साक्षात्कार मदतीला धाऊन येत करून दिला आहे.निर्भिड भुमिका आणि कर्तव्यदक्ष म्हणून भिवंडी उपविभागीय अधिकारी यांनी केलेल्या कार्यातून त्या महिलेचे समाधान तर झालेच परंतू शासन सदैव गोरगरिबांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे हे आपल्या कृतीतुन सिध्द करून दाखविले असून तिची जोपर्यंत शिधापत्रिका ऑनलार्इन नोंदणी होत नाही तोपर्यंत तिला धान्य दण्याचे आदेश भिवंडी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी पुरवठा विभाग अधिकारी यांच्याशी चर्चा करून दिले आहे.

No comments