0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

गडचिरोली पोलीस दलाला विविध कामांसाठी लागणारा निधी, बांधकामे, शहीद जवानांच्या वारसांना नोकऱ्या तसेच जिल्ह्यातील पोलीस भरती अशा विविध शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला.सीमाभागात अतिशय जोखीम पत्करुन आपले पोलीस बांधव कार्यरत आहेत. त्यांच्या समस्या, अडचणी प्राधान्याने सोडवून आवश्यक त्या सर्व सुविधा तसेच शासनस्तरावर  प्रलंबित प्रस्ताव  तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी  यावेळी दिले.मंत्रालयातील समिती सभागृहात आयोजित या बैठकीस अपर मुख्य सचिव गृह मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव अपिले व सुरक्षा आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे,  व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस, गृहनिर्माण व कल्याण, महामंडळ विवेक फणसळकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील कटेझरी येथील  पोलीस मदत केंद्रांला भेट दिली होती. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर  गृहमंत्री वळसेपाटील यांनी ही  आढावा बैठक घेतली.

 

Post a Comment

 
Top