web-ads-yml-728x90

Breaking News

सावकार श्रीमंताच्या दावणीला बेजबाबदार सरकार आणि पोलिस यंत्रणा अन्यायग्रस्त;83 वर्षीय वयोवृध्दानी दिला मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

गेली 2010 पासुन न्यायासाठी झगडणाऱ्या 83 वर्षीय वयोवृध्द शेतकऱ्याला कोणत्याच बेजबाबदार सरकारने न्याय दिला नसुन पडघा पोलिसानी वेळोवेळी सावकाराच्या गुंडगिरीला अबय दिल्याने अखेर 83 वर्षीय वृध्द शेतकर्यानी मंत्रालयासमोर आत्मदहन करून घेण्याची शवटची इच्छा असल्याची तक्रार केली आहे.वयोवृध्द वारकरी सांप्रदाय 83 वर्षीय वयोवृध्द गरीब शेतकर्यानी आपल्या कुळवहिवाट कब्जेदारीची जमिन सावकाराकडुन मिळवण्यासाठी 2010 पासुन पर्यंत केले मात्र आतापर्यंत सत्तेत असलेल्या सर्व सरकारने चौकशावर चेंडु पेलवला अधिकार्यानी ...रामखोरी ला..चखोरी करत सावकार अविनाश दिगंबर गुप्ते, विलास दिगंबर गुप्ते ,चंद्रकांत गुप्ते त्यांच्या वारसाशी संगनमत करून एकदा कुळाना विक्री झालेल्या जमिनीची दुबारा विक्री करून वयोवृध्द शेतकर्याची जमिन हाडप केली त्यावरच थांबले नाहीत तर वयोवृध्द शेतकर्यांच्या मालकी सातबारा जमिनी मधील झाडे तोडुन चोरी केली.जमिनीची नासधुस केली जमिनीमध्ये बाहेरील गुंन्ड आणुन अतिक्रमन करण्याचा प्रयत्न केला अशा गुंडगिरी करून 83 वर्षाच्या वयोवृध्दाला मारहारणीसाठी धावुन जाणार्या अविनाश दिगंबर गुप्ते,विलास दिगंबर गुप्ते,अमोल चंद्रकांत गुप्ते, चंद्रकांत दत्तात्रय गुप्ते, मंगल शिवराम शेलार ,सुनिता सुधीर गुप्ते अन्य गांव गुंन्डानी वयोवृध्द शेतकयावर 26 मे 2021 रोजी शिवीगाळी करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याची फिर्याद पडघा पोलिसात वयोवृध्दानी दिली असता त्याला हाकलुन लावल्याने पोलिस आणि गुप्ते गुंन्डगिरीला फटाळुन बेजबाबदार सरकार आपल्याला न्याय देवू शकत नसल्याने मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याची विनंती तक्रार शेतकर्यानी केली आहे.याच शेतकर्यांनी तीन वर्षापुर्वी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता त्याची तक्रार मुख्यमंञ्यांकडे होताच तात्कालीन पडघा पोलिसानी सदर वयोवृध्दाला समन्स काढुन त्याचा आवाज दाबण्याचा काम केला.निवडणुका अचार सहिता आहे तुमच्या विरोधात कोर्टात पुरावे देवु अशी धमकी देवुन जबाब लिहुन घेवुन तुमच्या मालकीचा सातबारामध्ये कोणी आल्यास आम्ही त्यावर कारवाकरू असे आश्वसन दिले होते त्यावेळीही हेच गुप्ते कंपनी विरोधात पोलिसात तक्रार दिली होती मात्र पैसा आणि गुंडगिरी यांच्या समोर वयोवृध्द शेतकर्याचा काहीही टिकाव लागला नाही.पुन्हा अविनाश दिगंबर गप्ते,विलास दिगंबर गुप्ते ,अमोल चंद्रकांत गुप्ते, चंद्रकांत दत्तात्रय गुप्ते ,मंगल शिवराम शेलार त्यांनी जमविलेल्या गैर मंडळानी वयोवृध्द शेतकर्याच्या कुटूंबीर्यावर हल्ला केला त्याची तक्रार पडघा पोलिसानी घेतली नसल्याने कायदा सुव्यवस्था गरीबाच्या संरक्षणासाठी नसुन माजी अधिकारी याचे नातेवा पैसे देणारे गुंन्डाच्या पाठिशी असल्याचा भाष होत आहे.अविनाश दिगंबर गुप्ते, विलास दिगंबर गुप्ते ,चंद्रकांत दत्तात्रय गुप्ते त्यांच्या सहकार्यानी गरीब कुळाच्या जमिनी हाडप करून खोटे कागदपत्र बनवुन तलाठी सर्कल तहसिलदार यांना हाताशी धरून त्याची विक्री केली आहे.त्यामधील काही शेतकर्यानी न्यायालयात त्यांच्या विरोधात दावे दाखल केले असुन सावकार शाहीची गुंडगिरी मोडुन काढण्यास अघाडी सरकारलाही अपयश आल्याने वयोवृध्द शेतकरी मंत्रालयासमोर आत्मदहन करत असल्याची लेखी तक्रार करून संबधिताना जबाबदार धरावे असे तक्रारीत म्हंटले आहे.सदरचा प्रकार पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सामाजिक संघटनानी तिव्र संताप व्यक्त केला आहे.

No comments