web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना covid-19 कोरोना काळात-१५००-हजार रुपयांची आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया शनिवारी सुरू

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण

राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना covid-19 कोरोना काळात-१५००-हजार रुपयांची आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारी-२२-०५-२०२१ रोजी सुरू होत आहे यासाठी सन्माननीय रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही केवळ रिक्षाचालकांनी ऑनलाइन प्रणाली व त्यांचे वाहन क्रमांक अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकाची नोंद करायची आहे यावर संगणक प्रणालीवर आपो-आप माहितीची पडताळणी होईल तसेच आधार क्रमांकाची लिंक असलेल्या खात्यात १५००-हजार रुपयांची मदत तात्काळ जमा केली जाईल

या संदर्भात मुख्यमंत्री मा-उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री मा-अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला याची अंमलबजावणी शनिवारी २२-०५-२०२१-पासून सुरू होत आहे

covid-19 कोरोना संकट काळात सन्माननीय रिक्षाचालकांना-१५००- हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी (आयसीआयसीआय)बँकेत स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे या प्रणालीवर परवानाधारक रिक्षा चालकांना-२२-मे-२०२१- शनिवारी पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे

No comments