web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडचे रेशनिंग धान्य डाळ काळयाबाजारात विकणार्‍या विरोधात श्रमजिवी आक्रमक;भाई,दिपक टोळीच्या विरोधात केंन्द्राकडे तक्रार

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

गेली 25 वर्षापासुन मुरबाड मध्ये खुल्लेआम गोर गरीब आदिवासी जनतेचे तांदुळ गहू साखर रॉकेल डाळ अन्य जिवनाश्यक वस्तुचा काळाबाजार करणार्यावर प्रत्येक सरकार अपयशी ठरत असुन रेशनिंग दुकानदाराचा उपयोग निवडणुकात करून घेतात अशा गरीबाचं धान्य वस्तू काळयाबाजारात विक्री करणार्या चार दुकानदारावर श्रमजिवीचे युवा नेते दशरथभाऊ भालके पंकज वाघ महेश वाघ त्यांच्या कार्यकर्त्यांनी चार दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यास मुरबाडचे तहसिलदार अमोल कदम यांना भाग पाडले आहे.काँगे्रस राष्ट्रवादी सरकारच्या कालावधीत ज्या 52 रेशनिंग धान्य दुकानदारावर रोजगार हमीचा धान्य काळयाबाजारात विक्रीचा आरोप झाला होता त्यापैकी 22 रेशनिंग दुकानदारावर पोलिसात गुन्हे दाखल आहेत मात्र त्यामधुन भाई,दिपक सारखे राजकीय हस्ती अर्शिवाद असलेल्याना क्लिनचिट देवुन पुढारपणानी गरीबांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले हेच काळाबाजार करणारे आजही आदिवासी गोरगरीबाचं धान्य डाळ साखर रॉकेल लाभार्थी कार्डधारकाचं खोटे थंब देवुन काळया बाजारात विक्री करत असुन भाईचा म्हैशीच्या गोटयात तर दिपकचा म्हसा परिसरात गोडावुन असल्याचे बोलले जात असुन 92 दुकानदाराचा रेशनिंग धान्य डाळ साखर खरेदी करून विक्री केली जात असल्याची तक्रार केंन्द्रीय पथकाकडे केली असल्याचे समोर आले असुन हे मोहन चालक भाई, दिपक कोण आहेत याचा शोध महसुल विभागाला घ्यावा लागणार आहे.जिल्हा पुरवठा तहसिलदार पुरवठा अधिकारी पासुन राजकीय नेत्याच्या राजकीय कार्यक्रमाचे खर्च हप्ते बांधील धान्य पुरवठा काळाबाजार सरास सुरू आहे.त्यांच्या तक्रारी गृहविभागाकडे चौकशीसाठी दिल्या होत्या त्या चौकशा गायब झाल्याचा पराक्रम महसुल खात्यानी केला आहे.श्रमजिवी संघटनाचे युवा नेते दशरथभाऊ भालके पंकज वाघ महेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कार्यकर्त्यानी मुरबाडच्या धान्य काळाबाजार करणार्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली असुन भाई दिपकसह अन्य धान्य काळाबाजार करणार्याचा शोध महसुलखात्यानी लावुन कठोर कारवा करावी अशी मांगणी होत आहे.कोरोना कालावधीत गेल्यावर्षी महसुल अधिकारी रेशनिंग धान्य दुकानदार यांनी तांदुळ गहू डाळ साखर रॉकेल यांचा प्रचंड काळाबाजार केला आहे.ऑनलानवर धान्य रॉकेल डाळ दिल्याची नोंद आहे.मात्र प्रत्यक्ष देण्यात आलेला नाही त्याची तक्रार स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी शासनाकडे केली होती त्याची चौकशी गृहविभागाकडे पाठवल्याचे सांगितले मात्र अद्याप चौकशी आहवाल समोर आला नाही सरकारचं भ्रष्टाचारी रेशनिंग धान्य काळाबाजार करणार्यांना पाठबळ देतात तसेच रेशनिंग काळाबाजार करणार्याचे राजकीय वर्चस्व संबध असल्याने कारवा होत नाहीत…(भाग 1)

 

No comments