web-ads-yml-728x90

Breaking News

पुढच्या काळात रूग्णांची हेळसांड होणार नाही म्हणुन भव्य कोव्हीड सेन्टरची उभारणी - जिल्हापरिषद प्रभारी अध्यक्ष सुभाषदादा पवार

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यातील मृत्युचा वाढता प्रमाण आणि कोव्हीड सेन्टरची गरज लक्षात घेवुन जिल्हापरिषदेच्या संकल्पनेतुन शिवळा कॉलेज मध्ये पाच दिवसात 60 बेडचे भव्यदिव्य कोव्हीड सेन्टर उभे करू शकलो त्यासाठी कॉलेजचे अध्यक्ष मा.आमदार गोटीरामभाऊ पवार साहेब त्यांचे सर्व शिक्षक कार्यकर्त्यांचे योगदान मदत मिळाली असे उदगार ठाणे जिल्हापरिषदचे प्रभारी अध्यक्ष सुभाषदादा पवार यांनी शिवळे कोव्हीड सेन्टरच्या उदघाटण प्रसंगी काढले. 

अनेक लोक खाजगी दवाखाण्यात जावुन घरीच राहिल्याने त्यांचा काही दिवसानी मृत्यु झाला भयानक स्थितीतुन मुरबाड तालुका जाताना भविष्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक रूमला स्वतंत्र टॉयलेट बाथरूम व्यवस्था भव्य क्रिडांगण अशा 60 बेडच्या कोव्हीड रूग्णालयाचे उदघाटण ठाणे जिल्हा शिवसेना ग्रामीण प्रमूख प्रकाशजी पाटील यांच्या हस्ते होतोय याचा आनंद होतोय असे सांगून मुरबाड तालुक्यातील पॉजीटीव्ह झालेल्या रूग्णांनी तात्काळ उपौचारासाठी येथे दाखल व्हावे असे आहवान सुभाषदादा गोटीरामभाऊ पवार यांनी केले.या कोव्हीड सेन्टर मध्ये रूग्णांना मानसिक तणाव वाढू नये यासाठी भजन मनोरंजन प्रबोधन असे कार्यक्रमाचे आयोजन करून मोफत भोजन तज्ञ डॉक्टर फार्मशी नर्स कर्मचारी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कठीबध्द असुन सर्वानी मदतीचा हात दयावा माझ्या स्वताकडुनही मदतीचा हात  दिला जा असे मार्गदर्शन केले.ऑक्सीजन व्हेंटिलेटर ॅब्युलेश सेवा दिली जाणार असुन पत्रकार पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक लोकप्रतिनिधी सर्व मिळून काम करू असे आहवान सुभाषदादा पवार यांनी केले.यावेळी शिवळा कॉलेजचे प्राध्यापक एस एम पाटील सर्व शिक्षक,फार्मशी शहा,तहसिलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी आवचर ,आरोग्य अधिकारी रेंगे, बनसोडे ,जिल्हाधिकारी आरोग्य अधिकारी कुंदन पाटील ,सर्व माजी जिल्हापरिषद सदस्य, विद्यमान सदस्य, पंचायत समिती सभापती ,शिवसेना तालुका प्रमुख ,डॉक्टर ,कर्मचारी ,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार सर, दिपक खाटेघरे ,तुंगार सर अन्य मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक दळवी सर यांनी केले तर आभार भगत सर यांनी मानले.यावेळी कुंदन पाटील आरोग्य सभापती तहसिलदार अमोल कदम तसेच कोव्हीड सेन्टरची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.रेंगे यांनी दिली.

No comments