web-ads-yml-728x90

Breaking News

वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ऊर्जामंत्र्यांनी केले कौतुक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

`तौक्ते` चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व राज्यातील इतर जिल्ह्यातील वीजयंत्रणेचे नुकसान झाले. दरम्यान, खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर सुरळीत केला. याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच अधिकाधिक मनुष्यबळ या कामी लावण्याचे व लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (संचलन) संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक (पारेषण) श्रीकांत राजूरकर यांनी संबंधित मुख्य अभियंते व अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योग्य त्या सूचना देऊन कामाबाबत वारंवार पाठपुरावा केला.नैसर्गिक आपत्तीमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे सोबत यंत्रणा दुरूस्तीचे काम देखील युध्दपातळीवर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. सध्या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रामुख्याने कोविड रूग्णालये, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उदयोग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी निर्देश दिले होते.

No comments