0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सुरू असलेल्या पर्जन्य जलसंकलनाच्या (रेनवॉटर हार्वेस्टिंग) कामाची आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. नगरसेविका विशाखा राऊत यांच्यासह महापालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.इथे 35 भूमिगत विहिरी तयार करण्याचे आणि पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात फारसे पाणी साचणार नाही. तसेच मैदानाच्या देखभालीसाठी लागणारी पाण्याची गरज भागेल व धुळ कमी होऊन मैदान परिसर हिरवागार राखण्यासाठीही याचा फायदा होणार आहे. तसेच चैत्यभूमीजवळ पावसाळी पाण्यासाठी असलेल्या आऊटफॉल पॉईंटच्या जागेला अर्बन स्पेसमध्ये रुपांतरित करण्याचे काम सुरू आहे. या कामाचीही मंत्री श्री. ठाकरे यांनी आज पाहणी केली. दरवर्षी लाखो नागरिक या स्थळाला भेट देतात. त्यांना सुंदर जागा उपलब्ध व्हावी असा प्रयत्न आहे, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top