web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिविर पुरवठ्याचे योग्य नियोजन सुरू – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिविरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.महाराष्ट्रात उत्पादित होणारा आणि इतर राज्यातून प्राप्त होणारा ऑक्सिजन राज्यातील जिल्ह्यांना सुरळीत आणि आवश्यकतेनुसार प्राप्त व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे (एफडीए) राज्यातील ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठ्याबाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात आले आहे.एफडीएमार्फत उत्पादकांना आज 1695 मे.टन ऑक्सीजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्रातून सूचना दिल्या गेल्या आहेत. 30 एप्रिल रोजी 1608 टन द्रवरूप वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेला असून, काल रोजी 1674 टन ऑक्सिजनच्या वितरणाबाबतची माहिती उत्पादकांनी प्रस्तावित वितरण पत्रावरून दिली आहे.अन्न व औषध प्रशासन व शासनाव्दारे या कामी नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्याद्वारा (नोडल अधिकारी) राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

No comments