web-ads-yml-728x90

Breaking News

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभाबाबत स्वयंसेवी संस्थांनी ‘माझे रेशन माझा अधिकार’ अंतर्गत जनजागृती करावी – नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र व गरजू शिधापत्रिकाधारकांना राज्य व केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या योजनानिहाय अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता ‘माझे रेशन माझा अधिकार’ असा मंच करुन स्वयंसेवी संस्थांनी देखील जनजागृती करावी, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत  लाभ पोहोचण्यासाठी शासनास सहकार्य करावे, असे आवाहन शिधावाटप नियंत्रक व संचालक, नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी केले आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) गरीब व गरजू पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ मिळावा याकरिता स्वयंसेवी संस्थासमवेत वेबिनारद्वारे ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री.पगारे बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्य अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचा लाभ मिळण्याकरिता जनजागृती करणेबाबत स्वयंसेवी संस्थांना आवाहन करण्यात आले.

No comments