0

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

महाविकास अघाडी सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांनी जनतेवर लादलेला लॉकडाऊन जनतेने स्विकारला असुन विरोधीपक्षाने सुध्दा जनतेच्या सरक्षणासाठी शासनाला पाठिंबा दिला आहे मात्र बदलापुर मध्ये भाजपाच्या आमदार किसनराव कथोरे यांनी मुरबाड मतदार संघात कडक लॉकडाऊन करण्यास शासनाला भाग पाडले त्यालाच सत्ताधारी पक्षाच्या लोकानी विरोध केल्याचे आमदार किसनराव कथोरे यांनी समोर आणले आहे.ठेकेदारी जाण्याच्या भितीने काही लोक बदलापुर लॉकडाऊनला विरोध करतात मात्र माझ्या मतदार संघात बदलापुर येतो येथे आमची ग्रामीण जनता मोठया प्रमाणात राहाते त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास आमच्या डोळयात पाणी येते त्यासाठी माझ्या जनतेचे संरक्षण करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी माझा पुढाकार आहे.परंन्तु पाच दिवस कडक लॉकडाऊन राज्यात अनेक ठिकाणी आहे.ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना अधिकार आहेत.मुख्याधिकारी यांना नाहीत जिल्हाधिकारी यांनी शहापुर मुरबाड कल्याण ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन केले आहे.त्याच प्रमाणे बदलापुर मध्ये कडक लॉकडाऊन जनतेच्या संरक्षणार्थ घेतला आहे.असेही आमदार किसनराव कथोरे यांनी सांगितले.सत्ताधायानी करायाला पाहिजे ते काम आम्ही विरोधक करतो आमचा मतदार आमची जनता यांचे संरक्षण करून आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं आमचं काम आम्ही करत आहोत.त्यामुळे कोणी ठेकेदाराच्या पोटात दुखत असेल त्याला काय करणार राजकारण निवडणुकीत करू मात्र आज सर्वानी एकत्र यावे जनतेला दिलासा दयावा कोरोनावर मात करावी अशी अपेक्षा आमदार किसनराव कथोरे यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

 
Top