web-ads-yml-728x90

Breaking News

कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लातूरमध्ये यंत्रणा कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येकाचे लसीकरण करण्यावर भर देताना १०० दिवसाच्या लसीकरणबाबतचा आरखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.श्री. देशमुख यांनी आज मंत्रालयातून लातूर शहर विधानसभा आणि मतदारसंघ तसेच महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्या तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याच्या कमी सर्वांनी सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.प्रारंभी या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांच्या सूचना व म्हणणे पालकमंत्री श्री देशमुख यांनी ऐकून घेतले. कोविड प्रादुर्भावाच्या संदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सोयीसुविधा, औषधाची उपलब्धता या संबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने शंका समाधान केले.सध्यातरी राज्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. राज्यात  कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. लातूरमध्येही दर दिवसाला १२०० पर्यंत रुग्णांची नोंद होत आहे. हे सर्व थांबण्यासाठी कडक लॉकडाऊनचे पालन आवश्यक असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.

 

No comments