0

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

देशात कोरोना गेल्या दोन वर्षे थैमान घालुन आहे.याच कोरोनाला नसतानाभुत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सोबत पोलिस यंत्रणा डॉक्टर यंत्रणा हे सदैव जनतेसाठी तत्पर आहेत.आपल्या कुटुंबाची परवानकरता समाजसेवेचा पोशाख घालुन या महामारी कोरोनाला हारवण्यासाठी आपल्या जिवाचीबाजी आज या लोकांनी लावली आहे.त्यातच ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात जनतेच्या सेवेसाठी दिवसरात्रौ काम करणारे कोरोना टेस्ट करणारे डॉक्टर कर्मचारी यांचे मुरबाडकरांनी आभार मानले आहे.तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे कोरोना टेस्ट व्यवस्थापक संभाजी भोईर डाटा एन्ट्री ऑपरेटर अक्षय कांबळे टेक्नीशीयन मोरेश्वर मोहपे श्रृती कदम राजेंद्र सोळंके प्रभाकर तासगांवकर पांडुरंग फुटणकर नितीन इशामे सफाई कामगार अनिकेत खाटेघरे यांनी मुरबाड तालुक्यातील जनतेसाठी नेहमी आपली जिवाचीपर्वा न करता आपल्या कामाला महत्व दिला आहे.तसेच यापुढे लगेच कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणुन सरकार कडुन सांगण्यात आले असुन आम्ही या कोरोनाला नष्ट करण्यासाठी तत्पर आहोत असे यावेळी आमच्याशी बोलतांना डॉक्टर कर्मचारी यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top