0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

ठाणे महापालिकेने कोविड हॉस्पिटलमध्ये कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट दिलेल्या ओम साई आरोग्यकेअर कंपनीने चक्क तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री मिरा चोप्राला कामावर ठेवलंय का...???  मिराला सुपरवायझर म्हणून काम करण्याचे कंत्राटदार किती पैसे देतोय....?कि लस घेण्यापूरते आयकार्ड दिले गेले.असे अनेक प्रश्न नागरिक विचारात आहेत.एकीकडे १८- ४४ वयोगटासाठी लस मिळत नाही आणि अभिनेत्री मीरा चोप्रा हिने पार्कींग प्लाझा कोविड रुग्णालयात सुपरवायझर म्हणून काम करते असे खोटे कार्ड वापरून लस घेतल्याचे समोर येत आहे.ओम साई आरोग्य केअर यांनी हे कार्ड दिले कसे असा आरोप अनेक राजकीय पक्षांनी केला आहे.याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

 
Top