web-ads-yml-728x90

Breaking News

भुकेल्य अनाथांचा दाता विशाल बनकर

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

सर्वत्र भितीच्या सावटा खालील ,कोरोनाच्या महामारीत ,ज्यो -तो आपआपल्याला ईतरा पासुन सुरक्षित ठेवण्याची दक्षता बाळगीत कुंटूबा सोबत घरामध्ये सुरक्षितता बाळगुण  मी भला आणी आपला कुंटूब, या मानसिकतेत   दिवस काढीत असता , मुरबाड बाजार पेठेच्या कडेला बसलेले भिकारी, अनाथांचा नाथ ,बनलेला एक मिसरूड न फुटलेला १९ वय असेल अवघे , असा एक कु. विशाल नावाचा " दाता " ईतरांसारखा  बॅटवर धावा काढण्याचे सोडून एका महान कार्ययात हरवुन   गेलेला पहावयास मिळत आहे.

गोरगरीबांना  अन्न्दान करण्या साठी धन लागतय असं  नव्हे तर, दानतही असावी लागते, मुरबाड तालुक्यात निवडणुकात मटनाच्या पंगती उठवणारे लोकांनी पाहिलेत  गोरगरीबांच्या जमिनी घेण्यात दंग श्रींमत  मात्र वाईट दिवसात गोरगरीबांना घोटभर पाण्याची मदत देण्याची दानत नसलेल्या  मुरबाडच्या लगकच्या झोपडपट्टीत वाडया पाड्यावर येथील गरीब व गरजु नागरिकांना हाताला काम मसल्या मुळे उपासमारीची वेळ आलेल्यासाठी  अवघ्या १९ वर्षाचा देवदुत  कु.विशाल बनकर  मुक्काम राहटोली या गावचा १२वी चा विद्यारथी   पारस बनकर सचिन फसाले विजय गोरे  अथरव बनकर केदार बनकर  व धनंजय घुघे त्याचे साथीदार  त्याच्याच वयाचे हे सवंगडी अन्नदाता बनुन गेले किती महिने हा उपक्रम राबवतात हे  त्यांना आठवत नाही परंतु दोनकमहिने  रोज किमान २५० ते ३०० भुकेल्याचे दाता ठरले आहेत 

मिसरूड न फुटलेला विशाल बनकर नावाचा " देवदुत" विशाल बनकर रोज संध्याकाळी जेवन बनवायचे साहित्य खरेदी करतो व सकाळी हि मित्रमंडळी २५०ते ३०० जेवन तयार करून त्याचे पॅकिंग करून दुपार पर्यत भुकेल्याची भुक भागविण्यासाठी पायपिट सुरू होते कधी वडापाव तयार केले जातात तर कधी खिजडी चे  पॅकिंग करून वाटप करतात                               कोरोना महा मारीत स्वताचा  व संवगड्याचा जिव धोक्यात घालुन  झोपडपट्टी ,वाडी ,वस्ती  पिंजून काढून भुकेल्याना दोन घास पुरवतात त्यातच अदिवासी अबाल वृद्ध या देवदुताची चातका प्रमाणे वाटपहात असतात 

अनाथांचा भुकेल्यांचा  घास बनुव अन्नदान करीत असलेला विशाल खिशातील पैसे संपले तर मित्रा कडून सोशल मिडीयाच्या मदतीने  सर्व जमवतोच  पण सेवेच खंड पडू देत नाही . घेतला वसा न टाकता,,,एक हात मदती साठी सरसावला आहे जगात देव नावाची शक्ती आहे की माहित नाही मात्र देवदुत असल्याचे या विशाल च्या रूपाने  जागोजागी मदतीचा हात देताना दिसुन येतात  मुरबाड पासुन २० किमी अंतरावरील बदलापुर मुरबाड हायवे लगतच्या  राहटोली गावचे हे सवंगडी या अदिवासी वाड्यावर रस्त्यालगतचे भिकारी यांचे जणू मसिहा च बनले आहेत

No comments