0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

राज्यातील कोरोना रुग्णवाढ लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्न करण्‍याची  गरज असल्याचे मत महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. निर्बंध असूनही राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री श्री. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.बैठकीस आरोग्यमंत्री  श्री. राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख, पोलीस महासंचालक श्री. संजय पाण्डेय, अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री. सौरभ विजय, आयुक्त श्री. रामास्वामी एन,  जे. जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.राज्यातील बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या 15 जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूदर अधिक असून तो कसा कमी करता येईल याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

 

Post a Comment

 
Top