web-ads-yml-728x90

Breaking News

आमदार किसन कथोरे यांनी तालुक्यातील आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यातील मौजे म्हसा,नारीवली,धसई,मोरोशी, शिरोशी,सरळगाव,शिवळे या प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच टोकावडे ग्रामीण रुग्णालयास भेट दिली आणि तेथील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना भेटून उपलब्ध आरोग्य सुविधांचा आढावा घेतला तसेच तेथील अडी-अडचणी जाणून घेतल्या.कोरोना रुग्ण शोधमोहिम,त्यांची चाचणी केल्यानंतर त्यांचे विलिनीकरण करणे तसेच आवश्यकता असल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे याबाबत आमदार साहेबांनी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना केल्या. गंभीर परिस्थिती असलेल्या कोरोना रूग्णांची विशेष काळजी घेणेबाबत सूचना करताना रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि इतर सुविधांबाबत काही अडचण असल्यास थेट माझ्यासोबत संपर्क साधावा असेही साहेबांनी सांगितले.कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण होणे फार महत्त्वाचे आहे,याबाबत साहेबांनी अनेक सूचना करून तालुक्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे,लसींचा पुरवठा सुरळीत करणे आणि लसीकरण करणारे कर्मचारी यांची संख्या वाढविणे बाबत प्रयत्न करत असून तालुक्यातील आरोग्य केंद्रे असलेली गावे तसेच लोकसंख्येने मोठी असलेली गावे यांच्या लसीकरणाबाबत प्राधान्याने विचार करून त्यांचे लसीकरण तातडीने हाती घेण्याबाबतच्या सूचनाही साहेबांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना केल्या.मुरबाडच्या ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काही धाडसी निर्णय घेण्याबाबत विचारविनिमय सुरू असून त्यातल्या त्यात चार दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावून याची सुरूवात करण्यात आली आहे.गावा- गावातील नागरिकांनी सहकार्य करून पुढील काही दिवस संयमाने लॉकडाऊनचे पालन केले तर नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल आणि वाढणारी कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात येईल असा विश्र्वास साहेबांनी व्यक्त केला.आरोग्य केंद्रे भेटी दरम्यान आमदार साहेबांसमवेत  मुरबाड ता.भाजपाचे अध्यक्ष श्री.जयवंत सुर्यराव,सभापती श्री.दिपक पवार, श्री.सुहास मोरे,श्री.अनिल घरत,श्री.चेतन घुडे हेही उपस्थित होते.

No comments