0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – उरण

राष्ट्रवादी कॉग्रेस उरण शहर व तालुका यांच्या वतीने आज उरणमध्ये केंद्र सरकार विरोधात  आंदोलन  केले.पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गँस दरवाढ, रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ तसेच चक्रीवादळात न झालेली मदत यामुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रावर करीत असलेल्या या अन्यायाचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण शहराच्या आणि तालुका वतीने आज उरण बाजारपेठेत गांधी चौकात  कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सामाजिक अंतर पालन पाळून केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणा बाजी करण्यात आली.

'देश मे मोदी है - तो महंगाई है. 'कोरोनाने वाचलो अन महागाई ने मेलो' अशा घोषणा व नारेबाजीतून केंद्र व मोदी सरकारचा निषेध व निदर्शने करण्यात आले. चुलीत घाला तुमची प्रधानमंत्री उज्वला योजना असा नाराजीचा सूरही यावेळी महिलांनी काढला असून जीवनावश्यक वस्तूंचे दिवसेंदिवस भाव वाढ होत असल्याने व मुख्यतः गॅस दरवाढ तर अक्षरश: आकाशाला भिडत असल्याने घरगुती आर्थिक बजेट कोलमडत आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस प्रशांतभाऊ पाटील , भावनाताई घाणेकर-महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस, मनोज भगत-तालुका अध्यक्ष, भार्गव पाटील -जिला उपाध्यक्ष, पुखराज सुथार-जिल्हा सरचिटणीस, कैलाश भोईर-तालुका युवक अध्यक्ष, गणेश नलावडे-शहराध्यक्ष, संध्याताई घरत-महिला शहराध्यक्ष, समाधान म्हात्रे-तालुका उपाध्यक्ष युवक, भूषण ठाकुर-तालुका सिटणीस मंगेश कांबळे ,प्रदीपशेठ तांडेल, बाबासेठ मुकरी, तफसुल फसाटे, सचिन पाटील, गणेश पाटील,राजेश म्हात्रे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Post a Comment

 
Top