web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी टास्कफोर्स व विभागाने समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील डॉक्टरांचा आणि महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणावा, यामध्ये बालकांना कोरोनापासून कशापद्धतीने सुरक्षित करता येईल याचे मार्गदर्शन करावे तसेच बालकांसंदर्भातील विभागाचा अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण होऊन करावयाच्या उपाययोजनांचा मार्गदर्शक सुचनांमध्ये समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.मुख्यमंत्र्यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना, निधी, कार्यपद्धती याचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, आयुक्त महिला व बालविकास श्रीमती पावनित कौर, आयुक्त एकात्मिक बालविकास श्रीमती इंद्रा मालो, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments