web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये मटका जुगार गुटखा दारू धंदे तेजीत

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

कोरोना कितीही जालीम असला तरी मुरबाड मध्ये दारू मटका गुटखा जुगार धंदयावर काहीही परिणाम होत नाही याची प्रचिती यंदाही आली आहे.सर्व दुकाने बंद आहेत मात्र मुरबाड मध्ये सर्वत्र मटका,जुगार,दारू ,गुटखा,बनावट थंडपेय याचे अडडे राजरोसपणे सुरू आहेत त्याकडे पोलिस यंत्रणा संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे.कोरोना गुटखा,दारू,बनावट थंडपेया विकणार्याना होत नाही का ? जुगार,मटका,गुटखा अडयावर जात नाही का ? सर्व ठिकाणी मंदी असेल मात्र मुरबाड मध्ये जुगार,मटका,गुटखा,दारू,बनावट थंडपेय यांची चांदी आहे.वरिष्ठ अधिकार्यांनी गुप्तचार पथकामार्फत धाड टाकल्यास मटका जुगार गुटखा दारू थंडपेय सारेच सापडतील मात्र त्यासाठी निर्भिडतेने काम करावे लागेल.

No comments