web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड शहरातील अपुर्ण रस्त्यामुळे आपघाताचे प्रमाण वाढले ठेकेदार अधिकार्‍यावर गुन्हां दाखल करण्यासाठी तक्रार

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

मुरबाड शहरातील मातानगर,झेंडा नाका,मुख्यबाजारपेठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते संतोषीमाता मंदिर मरीआई मंदिर अशा सर्वच रस्त्याची बोगस निकृष्ट अपुर्ण कामे भाजपाचे माजी नगराध्यक्षानी पोट ठेकेदारीने केली असुन खोटी बिले काढली आहेत.त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे तात्कालीन शाखा अभियंता तसेच आताचे अभियंता यांच्याकडे राजकीय सत्ता दादागिरी वापरून अधिकार्याना पैसे देवुन बिले काढली आहेत.त्याकामाचे फोटो मापे घेतली नाहीत गुणवत्ता चाचण्या तपासण्या नाहीत कोटीची बिले काढली त्याचप्रमाणे मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ,जुनियर इंजिनियर औसरकर यानी कोटी रूपायाची खोटी बिले काढली आहेत.विशेष म्हणजे स्वामी समर्थ बैठकीचे  हॉल जवळ पुर्वी केलेले काम दाखवुन मार्कंडे कंन्ट्रक्शनच्या नावे याच माजी नगराध्यक्षानी 10 लाखाचा बिल काम करता काढला त्यानंतर कामे करता अनेक कामाची बिले काढली आहेत या भ्रष्टाचाराला नगरविकास विभाग ठाणे मुंबई तसेच मुरबाड नगरपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे.अपुर्ण रस्त्यामुळे एका वेळा दोन वाहाने जात नाहीत गटारी अपुर्ण आहेत.पिव्हरब्लॉक अपुर्ण आहेत साईटपट्टी नाही रस्ते खडडेमय झाले आहेत अनेक रस्त्यावर पुन्हा पुन्हा टेंडर काढले असुन ताडआळी,गणेशनगर,माळीपाडा,बागेश्वरी तलाव,गोर्हाचापाडा,संभाजी नगर ,हनुमान आळी,जैनमंदिर, मातानगर,सोनारपाडा,देवीची आळी,रेशनिंग गोडावुन,बाजारपेठ अशा सर्वच रस्ते निकृष्ट बोगस बनवुन कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे.अशा ठेकेदार अधिकार्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी गुन्हे आन्वेषण विभाग लाचलुचपत विभागाकडुन करावी अशी तक्रार स्वतंत्र संपादक पत्रकार संघानी केली आहे.

No comments