web-ads-yml-728x90

Breaking News

अंबरनाथ बदलापूर निवडणूक होईपर्यंत प्रशासकांना मुदतवाढ नगर परिषदांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - बदलापूर

अंबरनाथ कुळगाव बदलापूर नगरपरिषद राज्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायत मध्ये नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या कालावधीचा मुदतवाढ देण्यात आली आहे आता या सर्व प्रशासकाकांच्या कालावधीची मुदत ही संबंधित नागरी स्थानिक सस्थेच्या आगामी निवडणुकीनंतरच्या पहिल्या सभेपर्यंत वाढवण्यात मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे दर-६-महिन्यानी मुदतवाढ देण्याची आवश्यकता नाही विशेष म्हणजे बदलापूर आणि अंबरनाथ महापालिकेचे प्रशासन पदाची जबाबदारी ही त्या पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनाच देण्यात आली आहे तर मुख्य अधिकाऱ्यांना प्रशासक पदाची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सदस्यांची मुदत-१७मे-२०२०-रोजी संपली आहे यापूर्वी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारी करण्यात आली होती प्रभाग रचना त्यांचे आरक्षण आदी बाबी पूर्ण झाल्या होत्या मतदार यादी जाहीर व्हायच्या आधी जगावर covid-19 कोरोनाचे प्रादुर्भाव वाढल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली परिणामी गेल्या वर्षी दोन्ही नगरपरिषदांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू झाली दोन्ही नगर नगरपरिषदांमध्ये उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सहा महिन्याचा कालावधी संपत असताना पुन्हा एकदा प्रशासकीय राजवटीची मुदत वाढवण्यात आली त्यानंतर उपविभागीय अधिकारी जगजीत गिरासे यांच्याऐवजी दोन्ही नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे प्रशासक पदाचा पदभार देण्यात आला कुळगाव बदलापूर नगर परिषदेत मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्यावर तर अंबरनाथ नगर परिषदेत मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्यावर प्रशासक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे प्रशासक पदाची मुदत संपण्याच्या आधीच ३०-एप्रिल-२०२१-रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार प्रधान सचिव महेश पाठक यांच्या सहीने प्रशासक पदाला मुदत वाढ देण्यात आली असून आता या नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर पहिली सभा होई पर्यंत या प्रशासकांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे

No comments