web-ads-yml-728x90

Breaking News

एमएमआरडीएमार्फत मुंबई उपनगरामध्ये सुरु असलेल्या विविध कामांची पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

एमएमआरडीएमार्फत मुंबई उपनगरामध्ये सुरु असलेल्या विविध कामांची आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. मालाड (पश्चिम) येथे एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येत असलेल्या समर्पित कोव्हिड-19 हॉस्पिटलच्या कामाची पाहणी करण्यात आली. कोरोना रुग्णांसाठी मुंबईत पुरेशा उपचार सुविधांची उपलब्धता करणे तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या अनुषंगाने हे सुसज्ज समर्पित कोविड 19 हॉस्पिटल उभारण्यात येत आहे, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यावेळी उपस्थित होते.

No comments