0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवउल्हासनगर

उल्हासनगरात एका इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळत आल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील मोहिनी पॅलेस इमारतीत आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीत 9 फ्लॅट आणि 8 दुकानं होती. इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला या घटनेनंतर अग्निशमन दलासह ठाणे महापालिकेच्या टीडीआरएफ आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. या इमारतीतील 11 जणांना अग्निशमन दलाने जखमी अवस्थेत बाहेर काढलं. तर टीडीआरएफने ढिगाऱ्याखाली दबलेल्या 4 जणांना मृतावस्थेत बाहेर काढलं. या घटनेची माहिती मिळताच खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी घटनास्थळी धाव घेतली (Building slab collapsed in Ulhasnagar).

 

Post a Comment

 
Top