web-ads-yml-728x90

Breaking News

भारताबाहेरील मराठी माणसांसाठी स्पर्धा; जर्मनी, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अमेरिका येथील नागरिक ठरले विजेते

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विभागातर्फे प्रथमच आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा आज निकाल लागला असून या स्पर्धेत जगभरातील 35 देशातील मराठी व अमराठी नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या स्पर्धेत जर्मनीचे ऋषिकेश आपटे , दक्षिण कोरियाचे प्रविणा इंद्रजित बागल,  सिंगापूरचे नंदकुमार देशपांडे, अमेरिकेच्या  विद्या हर्डीकर सप्रे हे विशेष प्रशस्तिपत्रकास पात्र ठरले आहेत तर जेम्स सिम्पसन आणि  जेन वोल्कोव्ह यांना अमराठी विशेष सहभाग म्हणून गौरविण्यात आले आहे.स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व सर्व देशातून अनिवासी भारतीयांनी या प्रकारच्या योजनेचे स्वागत केले. भारताबाहेर स्थित 10 पेक्षा अधिक मराठी तसेच महाराष्ट्र मंडळांनी या स्पर्धेचा प्रसार करण्यास मदत केली. एकूण 35 देशामधील 1245 अनिवासी भारतीयांपर्यंत या स्पर्धेची माहिती पोहोचली व 118 लोकांनी प्रतिसाद दिला. अमराठी लोकांनी मराठी भाषा विभागाचे आभार मानले व चित्रफितीद्वारे या स्पर्धेत सहभाग घेतला.

No comments