web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोना चाचणी न करता परराज्यातून येणाऱ्या नागरिकांचे चोर मार्गाने ठाणे स्थानकातून पलायन

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

परराज्यातुन परतत असलेले नागरिक कोरोना चाचणी न करता ठाणे स्थानकातून चोर मार्गाने पलायन करत आल्याचे समोर येत आहे त्यामुळे ठाणे शहरात कमी होत असलेल्या कोरोनाबधितांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.ठाणे स्थानकातील एसटी स्थानकासमोरील बंद प्रवेशद्वाराच्या बाजूने वाट काढत हे परराज्यातील नागरिक ठाणे स्थानकातून पलायन करत आहेत.ठाणे स्थानकात सॅटिस ब्रिजवर परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची अँटीजन कोरोना टेस्ट करण्यात येत परंतु यापासून वाचण्यासाठी हे पलायन होत आहे.असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.त्यामुळे ठाणे शहरात पुन्हा कोरोनाबधितांच्या आकडा वाढू शकतो यासाठी ठाणे महापालिकेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

No comments