0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त मा.विवेक फणसाळकर यांच्या बदलीनंतर ही गेले काही दिवस विक्त असलेल्या पोलिस आयुक्तपदी अखेर भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ पोलीस अधिकारी मा.जय जीत सिंह यांच्या नियुक्तीचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे मा.जय जीत सिंग यांच्या नियुक्तीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांन मध्ये अखेर समन्वय घडून आल्यामुळे त्यांच्या ठाणे पोलीस आयुक्त पदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाला आहे मा-जय जीत सिंह हे भारतीय पोलीस सेवेतील-१९९०-च्या बॅचचे आयएएस आहेत गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये या-जय जीत सिंग यांची नियुक्ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अतिरिक्त पोलीस महा संचालक पदावरून महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुख पदी करण्यात आली होती गेल्याच आठवड्यात ठाण्याचे पोलिस आयुक्त मा-विवेक फणसाळकर यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची नियुक्ती महाराष्ट्र पोलिसांच्या गृहनिर्माण मंडळात करण्यात आली त्या वेळेपासूनच महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख असलेले मा-जय जीत सिंग यांच्या नावाची चर्चा ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी होतीतथापि मा-जय जीत सिंग यांच्या नावाबाबत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये एक वाक्यता होत नव्हती

 

Post a Comment

 
Top