web-ads-yml-728x90

Breaking News

संपत्ती कोणी बरोबर घेवुन जात नाही कोरोनानी दाखवलं जात धर्म पक्ष सर्व गौण आहे कोव्हीड काळात आधार देणाराच देव आहे - ठाणे जिल्हा शिवसेना ग्रामीण प्रमूख प्रकाश पाटील

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुत्युचादर कमी करायाचा असेल तर रूग्णांना मार्गदर्शन प्रबोधन झालं पाहिजे.रूग्णाच्या डोक्यातुन कोरोना काढुन कोव्हीडचा रूग्ण पुन्हा घरी गेला पाहिजे.कोरोना मध्ये उदयाचे काही सांगता येणार नाही कोणी संपत्ती बरोबर घेवुन जाणार नाही जात धर्म पक्ष सर्व गौण आहे कोव्हीड काळात आधार देतो तोच खरा लोकांचा देव असतो असे प्रतिपादन ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना प्रमूख प्रकाशजी पाटील यांनी शिवळे येथे केले.ठाणे जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सुभाषदादा गोटीराम पवार यांच्या संकल्पनेतुन शिवळा कॉलेजच्या इमारतीमध्ये 60 बेडचं भव्यदिव्य सुसज्ज कोव्हीड सेंन्टर सुभाषदादा पवार यांनी उभे केले आहे.त्याचे उदघाटण ठाणे जिल्हा शिवसेना ग्रामीण प्रमूख प्रकाशजी पाटील ठाणे जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सुभाषदादा पवार जिल्हापरिषदेचे आरोग्य सभापती कुंदन पाटील तहसिलदार अमोल कदम सर्व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तसेच सदस्य आरोग्य अधिकारी रेंगे उपकार्यकारी अधिकारी भोसले गटविकास अधिकारी आवचर पंचायत समिती सभापती दिपक पवार तालुकाप्रमुख कांतीलाल कंठे रामभाऊ दळवी अन्य मान्यवराच्या उपस्थितीत पार पडले यावेळी प्रकाश पाटील बोलत होते.डॉक्टर नर्स कर्मचारी पोलिस पत्रकार जिल्हाधिकारी तहसिलदार यांनी जिवाची पर्वा करता काम केले इतरानीही मदत केली त्यांना लोकानी देवाचा दर्जा दिला आहे.संकटसमयी मदत करणार नाहीत त्यांना लोक मदत करणार नाहीत म्हणुन आपण सायांनी एकत्र येवुन कोव्हीडच्या नियमाचे पालन करून मदत करावी असे आहवानही प्रकाशजी पाटील यांनी केले आहे.सर्वानी योगदान देवु या असे ही त्यांनी सांगितले.

No comments