web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी लागणार - एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – वसई

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी आपण आधीपासूनच सज्ज रहायला हवे, असे मत नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. पालघर जिल्ह्यातील उसगाव डोंगरी येथे श्रमजीवी संघटनेने सुरू केलेल्या लहान मुलांसाठीच्या कोविड रुग्णालयाचे  उद्घाटन पालकमंत्री शिंदे यांच्याहस्ते शनिवारी पार पडलं त्यावेळी ते बोलत होते.पालघर जिल्ह्यातील उसगाव डोंगरी येथे श्रमजीवी संघटनेच्या विधायक संसद या उपक्रमातून बाल कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. तसेच या भागातील ग्रामीण आदिवासी रुग्णांना कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १०० बेड्सच्या रुग्णालयाचे भूमिपूजनही पालकमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जेव्हा दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. त्यानंतर बेडची कमतरता,  रेमडेसीवीरचा तुटवडा आणि ऑक्सिजनची कमतरता इत्यादी गोष्टीची कमतरता सर्वत्र भासू लागली. परंतु, पूर्णपणे सरकारवर अवलंबून न राहता काही समाजसेवी संस्था आणि संघटना मदतीसाठी पुढे आल्या आणि त्यांनी स्वतःची सामाजिक जबाबदारी ओळखून लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. सध्या कोरोनाचे संकट ओसरत आहे असे वाटत असतानाच म्युकरमायकोसिस सारखे नवीन आजार उद्भवू लागले आहेत. या आजारांना तोंड द्यायचे असेल तर आपल्याला आतापासून तयारी करून ठेवणे आवश्यक असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.श्रमजीवी संघटनेचे सर्वेसर्वा श्री. विवेक पंडित यांनी यावेळी पालकमंत्री श्री. शिंदे यांचे विशेष आभार मानले. ज्या ज्या वेळी जी गरज लागेल ती करण्यासाठी पालकमंत्री श्री. शिंदे कायम आमच्यासोबत ठामपणे उभे असतात. त्यांच्या सहकार्यामुळेच हे बाल कोविड केंद्र आणि रुग्णालय उभारण्याची झेप घेणे शक्य झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री. विवेक पंडित, स्थानिक खासदार डॉ. राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा तसेच कोविड केंद्रात उपचार करणारे डॉ. वर्षा आणि डॉ. राजेश भोसले यांच्यासह श्रमजीवी संघटनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments