web-ads-yml-728x90

Breaking News

'तौक्ते' महाराष्ट्रात धडकणार नाही; सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात जाणवणार प्रभाव

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौक्ते चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ गोवा किनारपट्टी पासून 250 किलोमीटर लांब आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा किनारपट्टी भागात जास्त असणार आहे. कारण या भागातूनही चक्रीवादळ जाणार असून, महाराष्ट्राला कुठे धडकणार नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी सायंकाळी 7 वाजता दिली आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम हा संपूर्ण कोकणामधील जिल्ह्यात दिसून येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 18 मे ला हे चक्रीवादळ गुजरातला पोहोचेल. या दरम्यान संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याबरोबर ताशी 40 ते 60 किलोमीटर वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. 16 मे आणि 17 मे रोजी मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे. रत्नागिरी आणि सिधुदुर्ग साठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर गोवा राज्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती भुत्ते यांनी दिली आहे.

 

No comments