web-ads-yml-728x90

Breaking News

सुरू केलेली कोव्हीड सेन्टर पुन्हा बंद करू नका - ज्योती शेलार

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

देशात कोरोना सुरू आहे गेल्यावर्षी कोरोना सेन्टर उभे करण्यावर शासनाने कोटी रूपये खर्च केले मात्र कोरोना गेल्याचे जाहिर करून कोव्हीड सेन्टर बंद पाडले त्याचा मोठा फटका दुसर्या लाटेत बसला आहे.त्यामुळे तिसर्या लाटेचा विचार करून सुरू असलेले कोरोना सेन्टर बंद करू नका असे विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा तथा स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय महिलाध्यक्षा सौ.ज्योतीताई शेलार यांनी शासनाला सुचित केले आहे.येत्या दुसर्या लाटेत मोठया प्रमाणात कोव्हीड सेन्टरची उभारणी केली आहे.कोटी रूपये शासनाचा खर्च झाला आहे.यापुढे लगेच कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणुन सरकार कडुन सांगण्यात येते त्याची काळजी म्हणुन सुरू केलेले सर्व कोव्हीड सेन्टर कोरोना संपृष्टात येई पर्यंत सुरूच ठेवावा तसेच खाजगी सरकारी शाळा यामध्ये सुरू असलेले कोव्हीड सेन्टर इतरात्र हालवावे अशी शासनाकडे मांगणी केली आहे. शासनाने यापुढे सोनोग्राफी,सिटीस्कॅन,एक्सरे मशिनी उपलब्ध करून सरकारी रूग्णालयात प्रत्येक कोव्हीड सेन्टरमध्ये दयावेत तपासणी लॅब ऑक्सीजन व्हॅन्टीलेटर तज्ञ डॉक्टर कर्मचारी इंजेक्शने या सर्व गोष्टी उपलब्ध करून देवून गोरगरीब लहान मुलांना त्यांचा लाभ दयावा अशी मांगणी सौ.ज्योतीताई शेलार यांनी केली आहे.

No comments