web-ads-yml-728x90

Breaking News

अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळातर्फे कलावंतांच्या संचात भव्य रक्तदान शिबिर आयोजन..!

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

आज महाराष्ट्रात कोविड -१९ या वैश्विक महामारीने थैमान घातलेले  आहे. लोकांना मोठयाप्रमाणात ऑक्सिजन प्रमाणेच रक्त व प्लाझमाची गरज आहे. त्याकरीता अशा अनुकूल परिस्थितीमध्ये पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जपावी व आपले कर्तव्य बजवावे या उदात्त भावनेने भावनेने भारतरत्न राजीव गांधी पुण्यतिथी निमित्ताने अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाने अनेक सामाजिक संस्था व स्थानिक पक्षाच्या मदतीने तसेच विजय शेट्टी अध्यक्ष अज्ञान रिसर्च अँण्ड एज्युकेशन ट्रस्ट, साधना मोरे संस्थापिका , उद्योग महिला बचत गट,  राजीव रत्न शिक्षण ट्रस्ट, शशिकांत नागावकर,  द.म.मु अध्यक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, देवेंद्र खलसे, अध्यक्ष लहुजी ब्रिगेड, महाराष्ट्र, विक्रम गोहर, मुंबई अध्यक्ष अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ‍, समाजसेविका वृषाली सावंत , मुंबई यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक २१ मे २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दु.२ . ०० वा. स्थळ : खोपकर चाैक, लोकसेवा हायस्कूल शेजारी. बी.जे.देवरूखकर रोड, नायगाव, दादर मुंबई - ४०००१४  येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून  मा.सामाजिक न्यायमंत्री श्री.चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस नेते मा.श्री. रविंद्र दळवी, मुंबईचे पालक मंत्री ना.श्री.अस्लम शेख,  शालेय शिक्षणमंत्री ना.वर्षाताई गायकवाड,  मुंबई काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. भाई जगताप, कार्याध्यक्ष श्री.चरणसिंग सप्रा, सहकार सेलचे मुंबई अध्यक्ष श्री. भाई सावंत,  जिल्हाध्यक्ष श्री.हुकुराज मेहता व मराठी चित्रपटसृष्टितील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थितीत राहणार असून.तेव्हा प्रत्येक कलाकर्मीने  रक्तदान सारखे पवित्र दान करुन एक  जीव वाचवण्याचे पुण्य करावे.असे आवाहन अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी केले आहे.शिवाय यां उपक्रमानंतर कलावंत व तंत्रज्ञ ज्यांच्यावर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे अशांना महामंडळातर्फे धान्य किट उपलब्ध करून देण्याचा मनोदय देखिल अध्यक्ष मोरे यांनी मांडला आहे.

No comments